या प्रकरणी पोलिसांनी तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पहिल्या वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून राहुल राज, एनएस जीवा, एनपी विवेक, रिगिल जीत आणि सॅम्युअल जॉन्सन यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, रॅगिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की त्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडले गेले आणि व्यायामासाठी वापरल्या जाणारे डंबेल त्यांच्या प्रायव्हेट पार्टला बांधण्यात आले व क्रूरपणे मारहाण केली गेली. एवढेच नाही तर पीडित विद्यार्थ्यांच्या गुप्तांगांना अशाच प्रकारच्या आणि तत्सम प्रकारच्या धारदार वस्तूंनी जखमा करण्यात आल्या. तक्रारीत म्हटले आहे की, वरिष्ठ विद्यार्थी नियमितपणे रविवारी ज्युनियर विद्यार्थ्यांकडून दारू विकत घेण्यासाठी पैसे उकळत असत आणि त्यांना मारहाण करत असत. जेव्हा सहनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या तेव्हा पीडित विद्यार्थ्यांनी धाडस केले आणि पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.