मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री कोझिकोडमध्ये, एक छोटे हॉटेल चालवणारा व्यक्ती त्याच्या दोन साथीदारांसह हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. लैंगिक अत्याचारापासून वाचण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे महिलेने सांगितले. त्या महिलेने काही काळापूर्वी आरोपी व्यक्तीच्या हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तसेच महिलेने पोलिसांना सांगितले की, तिघे तिच्या खोलीत घुसले.स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने इमारतीवरून खाली उडी मारली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि स्थानिक लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.