मिळालेल्या माहितीनुसार आज, गुरुवार, 2 जानेवारी, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी येथील राजभवनात आयोजित समारंभात केरळचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. तसेच केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी सकाळी 10.30 वाजता आर्लेकर यांना शपथ दिली.
तसेच या शपथविधी सोहळ्याला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.