भारतातील या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात होतात-नितीन गडकरी

शनिवार, 14 डिसेंबर 2024 (18:33 IST)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना अलीकडेच भारतातील टॉप 4 राज्यांची नावे दिली जिथे रस्ते अपघात सर्वाधिक होतात. केंद्रीय मंत्री म्हणाले की दरवर्षी 1,78,000 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात आणि यापैकी 60 टक्के बळी हे 18 ते 34 वयोगटातील असतात. 

अलीकडेच अपघाताच्या प्रकरणात वाढ झाली आहे. या क्षेत्रात आमच्या विभागाला अपयश आले आहे. 
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्याची नावे उघड केली आहे. ते म्हणाले, यूपीमध्ये 23652, तामिळनाडूमध्ये 18347, महाराष्ट्रात 15366 आणि मध्य प्रदेशात 13798 प्रकरणे आढळून आली आहेत. ते म्हणाले की 1457 हून अधिक मृत्यूंसह दिल्ली सर्वात जास्त प्रभावित शहर आहे, त्यानंतर बेंगळुरूमध्ये 915 मृत्यू आणि जयपूरमध्ये 850 मृत्यू आहेत. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, रस्ते अपघातात एवढ्या लोकांचा मृत्यू होऊनही कायद्याचा धाक राहिलेला नाही. काही लोक हेल्मेट घालत नाहीत तर काही लोक लाल सिग्नलचे उल्लंघन करतात. याशिवाय रस्त्यावरील ट्रकचे पार्किंग हे अपघातांचे प्रमुख कारण असून अनेक ट्रक लेनची शिस्त पाळत नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, जेव्हा ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातात तेव्हा त्यांना भारतातील रस्ता सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलायला लाज वाटते मी यावेळी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी अधिकाऱ्यांना बसची निर्मिती करताना आंतराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याचे आदेश दिले ते म्हणाले, बसच्या खिडकी जवळ हातोडा असावा जेणे करून अपघात झाल्यास खिडकीचा काच सहज तोडता येईल. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती