सामूहिक बलात्कार पीडितेने पालकांना पत्र लिहून जीव दिला,पत्रात लिहिले..

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (10:30 IST)
राजस्थानमध्ये वाढत महिला गुन्हेगारी आणि बलात्कार प्रकरणामध्ये  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बाडमेर जिल्हा मुख्यालयात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर पीडितेने बदनामी होण्याच्या भीतीने मृत्यूला कवटाळल्याने खळबळ उडाली. या मयत मुलीच्या नातेवाईकांना मुलीच्या कपड्यात सुसाईड नोट सापडल्याने ही घटना उघडकीस आली.
बारमेर जिल्हा मुख्यालयातील गंगई नगर येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने ने काल रात्री घरातल्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्वात मोठी बाब म्हणजे आत्महत्येनंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन त्यांच्या गावी पोहोचले होते. याठिकाणी महिलांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृताचे कपडे पाहिले असता त्यांना सुसाईड नोट सापडली.
 
 त्यात तिने लिहिले आहे की , 'पप्पा मी आपला जीव देत आहे मला मरायचे नाही , पण काय करणार लोक बदनामी करतील तुम्हाला काही बोलतील माझे स्वप्ने अपूर्ण राहिले. महेंद्रने विश्वासघात केला .माझ्या वस्तू कोणालाही देऊ नका. सॉरी 'पपा'  त्यानंतर महिलांनी घरप्रमुखाला सांगितले, त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांना कळवले.
 
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाडमेरला आणण्यात आला. वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आत्याचा चा दीर महेंद्र सिंह  आरोपीने ही संधी साधून तिचावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचे शोषण सुरू झाले. त्यानंतर या घटनेत आरोपीने त्याच्या मित्राचाही समावेश केला. यादरम्यान अशा मयताला आक्षेपार्ह फोटो काढून धमकावले आणि त्यामुळे पीडितेने बदनामी होण्याच्या भीतीने मृत्यूला कवटाळले .
घटनेची माहिती मिळाल्यावर कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताचे वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन करून घेतल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध गँगरेप पॉक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती