नर्सने रुग्णाला केस ओढत खेचले

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (17:01 IST)
सीतापूर : यूपीमधील सीतापूर जिल्हा रुग्णालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्टाफ नर्स महिला पेशंटला कसे पकडून ओढत आहे हे दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात कोणीतरी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.
 
 हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने पेट घेतला. त्यावर जिल्हा रुग्णालयाचे सीएमएस डॉ आरके सिंह यांनी सांगितले की, महिलेला 18 रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 रोजी सायंकाळी तिचे कुटुंबीय तिला सोडून निघून गेले. त्यानंतर महिला अस्वस्थ झाली, त्यानंतर तिने बाथरूममध्ये जाऊन बांगड्या फोडल्या आणि कपडे फाडण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत तेथे उपस्थित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून इंजेक्शन देऊन झोपवले.

संबंधित माहिती

पुढील लेख