नवऱ्यानं बायकोची 100 नंबर डायल करून पोलिसात तक्रार केली, पोलिसांनी पतीलाच धडा शिकवला

सोमवार, 21 मार्च 2022 (13:30 IST)
एका पतीने पोलिसात चक्क आपत्कालीन फोन नंबर 100  डायल करून पत्नीची अशी तक्रार केली  जे ऐकून पोलीसही भडकले आणि पतीला चांगलाच धडा शिकवला. खरं तर, पतीने वारंवार 100 डायल करून पोलिसांकडे तक्रार केली की त्याची पत्नी त्याच्यासाठी मटण करी बनवत नाही. तक्रार केल्यावरून पोलिसांनी पतीला आवश्यक सेवेचा दुरुपयोग केल्यावरून कारागृहात पाठवले.
 
तेलंगणामध्ये एका व्यक्तीने या 100नंबरवर वारंवार फोन करून आपल्या पत्नीची तक्रार केली. त्यांच्या पत्नीने मटण करी बनवली नव्हती, त्यावरून पतीने  100 नंबर डायल केला. मात्र, तो माणूस आता तुरुंगात आहे. नालगोंडा जिल्ह्यात होळीच्या निमित्ताने एक विचित्र घटना घडली आहे. कनागल मंडलातील चेरला गौराराम गावातील नवीनने आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार करण्यासाठी एकदा नव्हे तर सहा वेळा 100 नंबर डायल केला.
 
शुक्रवारी रात्री नवीनने  मद्यधुंद अवस्थेत फोन घेऊन  100 नंबर डायल केला. पत्नीने सणासुदीच्या दिवशी मटण शिजवण्यास नकार दिल्याचा त्यांना राग होता. पोलिसांनी सुरुवातीला प्रँक कॉल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा नवीनने कॉल करणे सुरूच ठेवले तेव्हा कॉल हाताळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना कळवले, त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांनी घेतला.
 
पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काही पोलिस कर्मचारी त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सार्वजनिक सेवेचा दुरुपयोग केल्या प्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
नवीन शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी परतला होता. त्याने सोबत काही मटण आणले होते आणि त्याच्या बायकोने ते शिजवावे अशी इच्छा होती. त्याच्या वाईट सवयींमुळे संतापलेल्या पत्नीने असे करण्यास नकार दिला. यानंतर त्याने फोन उचलला आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी डायल 100 सुविधेचा गैरवापर करू नये कारण यामुळे पोलिसांच्या मौल्यवान वेळेची हानी होते आणि वास्तविक आणीबाणीच्या वेळेच्या कॉलला उपस्थित राहण्याच्या त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती