वर्षातील पहिला मन की बात कार्यक्रम, PM मोदी सकाळी 11:30 पासून देशाला संबोधित करतील

रविवार, 30 जानेवारी 2022 (11:27 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2022 च्या पहिल्या मन की बात कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम 11:30 वाजता सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या या शोचा हा 85 वा भाग आहे. ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, आकाशवाणी बातम्या आणि मोबाईल अॅपद्वारे हा कार्यक्रम ऐकता येईल. 
 
यावेळी तो नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीराने सुरू होईल. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11.30 वाजता मन की बात कार्यक्रम सुरू होईल. खरे तर आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीही आहे. पीएम मोदी प्रथम बापूंना श्रद्धांजली वाहतील, त्यानंतर ते रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमात सहभागी होतील. पूर्वी हा कार्यक्रम नेहमी सकाळी 11 वाजता सुरू होत असे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती