सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नात मित्र मैत्रिणी प्रचंड दंगा करतात आणि एन्जॉय करतात. लग्नाच्या हंगामात अनेक वेळा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. लग्नात स्टेजवर बसलेल्या वरवधूंना गिफ्ट देण्याची प्रथा आहे. कधी काही लोक असे काही गिफ्ट देतात ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये वरवधू हे स्टेजवर बसले आहे. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना एक मोठा बॉक्स भेटवस्तू म्हणून दिले. भेटवस्तू पाहून नववधू खूप उत्साहित झाली तिने स्टेजवरच ते गिफ्ट बॉक्स उघडण्याचा निर्णय घेतला आणि तिने तो गिफ्ट बॉक्स उघडला .त्यात एक अजून बॉक्स होता. अशा प्रकारे तिला अनेक पॅकेट उघडावे लागले.