राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक एका निरागस मुलाला शाळेच्या वर्गात कोंडून स्वतः घरी गेले. त्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. त्यांनी ग्रामस्थांसह शाळेला घेराव घालून घोषणाबाजी केली.
हे प्रकरण दौसा येथील रामसिंगपुरा येथील महात्मा गांधी सरकारी शाळेशी संबंधित आहे, जिथे सुट्टीच्या काळात शिक्षकाने इयत्ता 2 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला घाईघाईने वर्गात बंद केले आणि स्वतः घरी गेले. अनेक तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला.