तारापूरजवळ एमआयडीसीमध्ये नोव्हाफिन रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत १३ जण गंभीर जखमी तर तीन जण ठार झालेत. या स्फोटाचे हादरे तब्बल १५ किमीचा परिसरात बसल्याचीही माहिती समोर येते आहे. सुमारे एक ते दीड तास स्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशीही माहिती काही स्थानिकांनी दिली.
या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की शेजारच्या आरती व भारत रसायन यांसह एकूण सहा कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या. बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की या कंपनीपासून तीन किमी अंतरापर्यंत असलेल्या इमारतींच्या घरांच्या काही काचा फुटल्या. तर
पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणी अनेक गावांमध्येही हादरे जाणवले. काही गावांमध्ये भूकंप झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या.