तसेच मुलीच्या घरचे मंडली मुलाला कपडे, नारळ देतात. दोन्ही पक्षांकडून मुलासाठी व मुलीसाठी अंगठ्या ठेवतात. मुलगा व मुलगी सर्व वडीलधाऱ्यांच्याआशीर्वाद घेऊन एकमेकांना अंगठ्या घालतात.अशा प्रकार साखरपुड़ाविधि पूर्ण होतो.
साखरपुडयाला लागणारे साहित्याची यादी-
वधु पक्षासाठी - हळद कुंकु, तेल, तूप, आसन, पाट, समई, निरंजन, घंटी, पळी, ताम्हण, तांब्याचे तांबे, ताट, उपरणं, टोपी, विड्याचे पाने, आंब्याचे डहाळे, अखंड सुपाऱ्या, नारळ, तांदूळ, वाटीभर साखर, सुटे पैसे, फळे पूजेसाठी.
वर पक्षाकडून लागणारे साहित्य : ओटीचे सामान, बदाम, खारीक, अक्रोड, सुपाऱ्या, हळकुंडे प्रत्येकी पांच ओटीसाठी पाच प्रकारची फळे, तांदूळ किंवा गहू, साडी-चोळी, अंगठी, पेढ्यांचा पुडा, विड्याची पाने, सुपारी