यापुढे रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही

गुरूवार, 8 मार्च 2018 (11:54 IST)

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली.

दुसरीकडे  अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबाना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाना रेशनवर १ किलो साखर पूर्वी १५ रुपये किलो दराने मिळायची. आता हा दर १५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती