‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक मागे घ्या, भाजपचा आदेश

सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:40 IST)
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश भाजपने दिले आहे. भाजपने बॅकफूटवर जात वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पुस्तक परत घेण्यास नकार दिला आहे. “शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेवर पुस्तक परत घेण्याचा प्रश्नच नाही. मी याबद्दल माफी मागणार नाही. तसेच हे पुस्तकही परत घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया देत जय भगवान गोयल यांनी दिली.
 
भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती