पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण: मास्टरमाईंडला अटक

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. झारखंडमधून ऋषिकेश याला कर्नाटक एसआयटीने जेरबंद केले आहे. 
 
लंकेश या राजाराजेश्वरी नगरमध्ये त्या राहत होत्या. अज्ञात इसमांनी घराची बेल वाजवून दरवाजा उघडताच गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार केला. छातीवर गोळी लागल्यानं गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबार करणारे तीन जण होते. हल्ल्यानंतर हे तीघेही फरार झाले. गौरी लंकेश या पत्रकार-लेखक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
 
कर्नाटकातील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांसाठी गौरी लंकेश यांनी अनेक लेख लिहिले होते. इंग्रजी आणि कन्नड भाषेत त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले होते. गौरी लंकेश यांनी नेहमीच कट्टर हिंदुत्ववादाचा विरोध केला होता. वैचारिक मतभेदाच्या कारणावरून त्या काही लोकांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात येतंय. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती