बायकोने केली शरीरसुखाची मागणी, नवर्‍याने केली जबर मारहाण

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (12:58 IST)
हे विचित्र प्रकरण अहमदाबाद येथे घडले असून या मुद्यावरुन पत्नीला जबर मारहाण करण्याची घटना समोर आली आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार बायकोने साहजिक नवर्‍याकडे शरीरसुखाची मागणी केली तर चिडून नवऱ्याने जबर मारहाण केली. याबद्दल तिच्या सासू-सासऱ्यांना समजल्यावर त्यांनी सुद्धा तिला मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
तक्रारदार महिलेचं 14 मे 2016 रोजी एका तरुणाबरोबर लग्न झाले. सुरुवातीला सर्व व्यवस्थि होतं मात्र 2018 मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर नवऱ्याची वागणूक बदलली. मागील काही महिन्यांपासून नवऱ्याने बायकोसोबत शारीरिकसंबंध ठेवणे बंद केले. आणि जेव्हा कधी ती शरीरसुखाची मागणी करायची तेव्हा तो चिडून मारहाण करायचा असे महिलेने सांगितले. 
 
महिलेने आग्रह धरल्यानंतर नवरा घर सोडून निघून गेला त्यामुळे सासू-सासऱ्यांनी छळ सुरु केला. पतीने अनेकाकंडून उधारी केलेली असून तो बायको आणि मुलाकडे लक्ष देत नसल्यामुळे महिलेने पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती