10 हजार उंटाची हत्या करेल ऑस्ट्रेलिया, कारण जाणून व्हाल हैराण

बुधवार, 8 जानेवारी 2020 (11:24 IST)
दक्षिणी ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याच्या कमीमुळे तेथील 10 हजार जंगली उंट ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुष्काळग्रस्त क्षेत्रात पिण्याचं पाणी वाचवण्याच्या उद्देश्याने दक्षिण ऑस्ट्रेलियामधील जंगली उंट मारले जातील.
 
हेलिकॉप्टरांमध्ये व्यावसायिक शूटरर्सद्वारे 10,000 हून अधिक उंट ठार मारले जातील. हे उंट ग्लोबल वार्मिंगमध्ये अतिशय योगदान देत आहे कारण 10 हजार उंट एका वर्षात एक टन कार्बनडायऑक्साइड समप्रमाणात मिथेन उत्सर्जन करतात जे 40 लाख कारींच्या उत्सर्जन समान आहे.
 
उल्लेखनीय आहे की ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या आगीवर पाण्याच्या कमीमुळे नियंत्रण करणे कठिण होत आहे. आगीवर नियंत्रण करण्यासाठी येथील अधिकार्‍यांनी उंटांना मारण्याचे आदेश दिले आहेत. तेथील मीडियाप्रमाणे अनंगू पीजंतजतजारा यांकुनितजतजरा भूमीमध्ये आदिवासी नेत्यांच्या एका आदेशावर हेलिकॉप्टराने शूटर्स दहा हजार उंटांना ठार मारतील. कारण स्थानिक समुदाय पाण्याच्या शोधात हल्ला करणार्‍या जनावरांची तक्रार करत आहे.
 
तेथील लोकं उष्ण आणि असुविधाजनक परिस्थितीत जगण्यासाठी मजबूर होत आहे कारण उंट आत येत आहे आणि चारी बाजूला पाण्याच्या शोधात फिरत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती