देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू

शनिवार, 11 जानेवारी 2020 (10:15 IST)
देशभरात नागरिकत्व सुधारणा  कायदा लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आजपासून हा कायदा देशात लागू केला आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. 311 मतांना हे विधेयक मंजूर झालं आहे. तर विधेयकाच्या विरोधात 80 मतं पडली होती. त्यानंतर, राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही विधेयकास मंजुरी देत स्वाक्षरी केली. 
 
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते अमित शहा यांनी उत्तर देत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचं धर्मनिरक्षेप असं आहे की, केरळमध्ये मुस्लिम लीग काँग्रेससोबत आहे, तर महाराष्ट्रात शिवसेना आहे, असं म्हणत शहा यांनी काँग्रेसना टोला लगावला. तसंच मुस्लिमांसोबत कोणताही द्वेष नाही, हे विधेयक येणारच, असा दावाही शहांनी केला होता. त्यानुसार हे विधेयक मंजूर करत मोदी सरकारने नागरिकत्व दूरस्ती कायदा मंजूर केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती