सनी देओलनं सापाचा फणाच गिळला

शुक्रवार, 25 जून 2021 (13:16 IST)
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील धरमजयगढ परिसरातील ओंगना गावात एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. येथे सनी देओल नावाच्या एका तरुणाच्या राहत्या घरात विषारी साप शिरला. त्यानं विषारी करैत साप पकडून फणाच गिळून घेतला. मात्र थोड्याच वेळात त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
ओंगना गावात वास्तव्यास असलेला सनी देओल घरात साफसफाई करत असताना त्याला एक साप आढळून आला. सनीनं तो साप पकडला आणि घराबाहेर येऊन लोकांना स्टंट दाखवू लागला. त्याच दरम्यान साप त्याला चापला. त्यामुळे सनीने संतापून सापाचं शिर कापून ते गिळलं.
 
दफन करण्यात आलेल्या सापासोबत स्टंट
बुधवारी ओंगणा गावात राहणार्‍या सनी देओल राठियाच्या घरी साफसफाईचे काम सुरू होते. त्यानंतर करैत हा विषारी साप बाहेर आला. साप पाहून कुटुंबातील लोकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला व त्याला जमिनीत पुरले. थोड्या वेळाने सनी देओल घरी पोहोचला तेव्हा घरातील लोकांनी त्याला संपूर्ण घटनेविषयी सांगितले. घरातील सदस्यांनी दफन केलेल्या जागेवरुन सनीने त्याला बाहेर नेले आणि हातात घेऊन स्टंट दाखवायला सुरुवात केली.
 
सापाचं शिर खाल्ल्यानं सनीची प्रकृती खालवली
सनीनं सापाला जमिनीतून बाहेर काढलं त्यावेळी तो जिवंत होता. सनी जिवंत सापासोबत स्टंट दाखवत होता. त्यादरम्यान त्याला साप चावला. त्यामुळे सनी भडकला. त्यानं सापाचं शिर दातानं चावून वेगळं केलं आणि ते गिळलं. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या धरमजयगढमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.
 
उलटी केल्याने प्राण वाचले
सिव्हील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, बुधवारी दुपारी या युवकाला सापाने चावा घेतला. स्नैक बाइट उजव्या हाताच्या तर्जनी बोटाजवळ होता. एवढेच नव्हे तर या तरुणानं सापाचा फणाच गिळून घेतला होता. त्यानंतर त्याची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली आणि त्याला उलटी झाली. उलटीत फणा बाहेर पडला. परिवाराने त्याला योग्य वेळी रुग्णालयात आणले. येथे त्याला एंटीवेनम इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर आता त्याची प्रकृती ठीक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती