महिलेने पाच मुलींसोबत रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली

शुक्रवार, 11 जून 2021 (09:38 IST)
छत्तीसगडमध्ये एका महिलाने आपल्या पाच मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी पोलिसांनी सांगितले की महासमुंद जिल्ह्यात एका महिलेने आपल्या पाच मुलींसह चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही महिला आणि तिची मुली रात्रीपासून बेपत्ता होती आणि गुरुवारी पहाटे ते ट्रॅकवर सापडले. मोठी मुलगी 17 वर्षांची असून सर्वात लहान मुलगी 10 वर्षाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
महासमुंदचे पोलिस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर म्हणाले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले आहेत आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, मृत महिला काल रात्रीपासून आपल्या मुलींसह बेपत्ता होती, परंतु तिच्या पतीने पोलिसांना कळवले नाही आणि नातेवाईकाच्या घरी त्यांचा शोध घेत होता. गुरुवारी सकाळी कुणीतरी मृतदेह ट्रॅकवर शोधून पोलिसांना कळविले.
 
एसपी पुढे म्हणाले की, जेवण्याच्या संदर्भात काही विषयावरून बुधवारी रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडणानंतर महिला आपल्या मुलींसह घरातून निघून गेली. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की घटनेसंदर्भातील अधिक माहिती तपासत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती