देहरादून. सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी एम्स, ऋषिकेश येथे कोविड -19मुळे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विमाला, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांचा विरोध टिहरी धरणाच्या बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. त्यांचे स्वत: चे घरही टिहरी धरणाच्या जलाशयात बुडाले होते. टिहरी राजशाहीचा त्यांनी कडाडून विरोध केला, त्यासाठी तुरुंगात जावे लागले. हिमालयातील हॉटेल आणि लक्झरी पर्यटनांच्या बांधकामाचा ते स्पष्ट बोलणाले विरोधक होते