चेहर्‍यासाठी उत्तम नारळाचं तेल, जर या प्रकारे वापरलं तर...

शुक्रवार, 21 मे 2021 (14:05 IST)
नारळाचं तेल वापरल्याने केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं असं आपण लहानपणापासून ऐकलं असेल. सौंदर्यांसाठी वापरल्या जाणार्‍या या जुन्या गोष्टी आज देखील तेवढ्‍याच फायद्याचा आहे. उन्हाळ्यात देखील नारळाचं तेल लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. नारळ तेलाचे औषधी गुणधर्म आरोग्य, सौंदर्य आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करंत. हे त्वचा आणि केसांना नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार बनवते. त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्‍या व्यतिरिक्त ते त्वचेपासून मुरुमांचे डाग काढण्यासही मदत करतं. आपण हे दुसर्‍या कोणत्याही तेलात मिसळून आणि चेहर्यासाठी एक सीरम बनवू शकता. नारळ तेल लावल्याने तुम्हाला कसा फायदा होईल याविषयी जाणून घ्या-
 
1. स्वच्छ त्वचा मिळवा 
त्वचा स्वच्छ मिळविण्यासाठी हे स्क्रब खूप प्रभावी आहे. हे स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला मध, ओट्स आणि नारळ तेल आवश्यक आहे. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट तयार करा. मग ते आपल्या हातांनी चेहर्‍यावर लावा आणि त्याभोवती गोल स्क्रब करा. हे प्रत्येक प्रकाराच्या त्वचेवर कार्य करतं. याने मृत त्वचा दूर होते आणि त्वचा चमकदार होते. हे स्किनला मॉइस्ट करण्यात मदत करतं. ज्यांच्या तोंडावर मुरुम आहेत त्यांच्यासाठी ही चिकित्सा चांगली आहे. 
 
2. डार्क स्‍पॉटसाठी
अनेकदा चेहर्‍यावर मुरुमांचे डाग राहून जातात. यावर उपचार म्हणून तेल वापरता येतं. यासाठी नारळ तेल, लेवेंडर ऑइल आणि फ्रैंकिसेंस इसेन्शियल ऑइल मिसळावं लागेल. हे तिन्ही मिसळून एका काचेच्या बाटलीत भरुन ठेवावं. मग ड्रॉपर लावावं. दररात्री झोपण्यापूर्वी हे लावावं. योग्यरीत्या मालिश करावी.
 
3. ड्राय स्‍किनसाठी
यासाठी मध आणि नारळ तेलाची आवश्यकता भासते. मध त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतं. या दोन्ही वस्तू मिसळून चेहर्‍यावर लावाव्या. काही मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.
 
4. डीप क्‍लीजिंगसाठी
घरी डीप क्‍लीजिंग करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि नारळ तेलाची गरज भासते. बेकिंग सोड्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फेमेटरी गुण आढळतात. हे पोर्सला डीप क्लीन करतात. ब्लॅकहेड किंवा एक्नेवर हे फायद्याचं ठरतं.
 
5. सुरकुत्यांवर नारळ तेल
नारळ तेलात जरा हळद मिसळून यात दूध मिसळावे. दुधात ‍लॅक्टिक अॅसिड असतं ज्याने त्वचा ब्राइट दिसतं आणि नियमित वापरल्याने आपल्याला हायपरपिगमेंटेशनने सुटका मिळेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती