दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी काल कुसुमाग्रज मराठी स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटरचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेएनयूमध्ये पोहोचले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने केली . निदर्शकांनी म्हटले की, "महाराष्ट्रात जाताना लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडणे चुकीचे आहे." मुख्यमंत्र्यांसमोर वेगवेगळ्या निदर्शकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही निदर्शकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि म्हटले की हिंदी सर्वांवर कशी लादली जाऊ शकते? तर काहींनी देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला आणि म्हटले की महाराष्ट्रात बिगर-मराठी लोकांना मारहाण केली जात आहे. यासाठी सरकार काय कारवाई करत आहे?
जेएनयूमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव १७ वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. परंतु तो केवळ कागदपत्रांपुरताच मर्यादित राहिला. तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या मनात अनेक वर्षांपासून हा प्रश्न होता की आपल्या मराठीला येथे स्थान का नाही. अखेर आज जेएनयूमध्ये मराठी अभ्यास केंद्राचे उद्घाटन झाले. परंतु या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण केला.