Photo: Symbolic
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील खाटूश्याम मंदिरात रेलिंग तुटल्याने अपघात झाला आहे. बरेली वळणावर असलेल्या खाटू श्याम मंदिरात एकादशीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान हा अपघात झाला. गर्दीमुळे मंदिराची रेलिंग तुटली, 12 फूट उंचीवरून भाविक खाली पडले. या अपघातात 7 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
शाहजहांपूर येथील खाटूश्याम मंदिरात एकादशीच्या दिवशी श्याम जन्मोत्सव साजरा केला जात होता. यावेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याने राज्य महामार्गासह अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी मंदिरात जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर मोठी गर्दी जमली होती. गर्दीमुळे काही लोक सिमेंटच्या रेलिंगवर उभे राहिले. जास्त वजनामुळे सिमेंटची रेलिंग कोसळून खाली पडली. जखमी भाविकांमध्ये पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने अपघात झाला
भाविक जखमी झाल्याने मंदिरात चेंगराचेंगरी झाली. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात एकूण 7 जण जखमी झाले आहेत.