मिळालेल्या माहितीनुसार, बरहाटा येथील रहिवासी असलेले नजीर हे सकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कामावर जात होते, त्यावेळी त्यांना दुचाकीवरून सापाच्या फुशारक्यासारखा आवाज आला, तेव्हा त्यांनी गाडीचे स्पीड मीटर पाहिले. तर काय त्यांना आत एक साप दिसला. नजीरने तात्काळ दुचाकी उभी करून कुटुंबीयांना माहिती दिली. स्पीड मीटरची काच थोडी हलली तेव्हा सापाची हालचाल झाली. नंतर नागिणीला कशीबशी स्पीड मीटरमधून बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.