मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा मुलाची आई शेजाऱ्यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती. वडील दुसऱ्या खोलीत होते. नवापुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणाले, “मुलाला झुल्यावरील स्टंटबाजीचे व्यसन होते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तथापि, त्याने नेकटाई घातली होती, जी स्विंगच्या लूपमध्ये अडकली आणि तो लटकला. त्याच्या वडिलांनी त्याला बेशुद्धावस्थेत पाहिले व रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यापूर्वी पोस्टमोर्टमसाठी पाठवला.