गुजरातमधील खरी परिस्थिती भयावह असून तेथील तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप - नाना पटोले

गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (15:50 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. गुजरातमधील खरी परिस्थिती भयावह असून तेथील तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप भाजपा करत असल्याचं नाना पटोले म्हणाले. गुजरात निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
 
"गुजरातचे निकाल जरी भाजपाच्या बाजूनं आज दिसत असले तरी ते लोकशाहीनं नव्हे, तर दबावतंत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. गुजरातमध्ये खरी परिस्थिती भयावह आहे. आमच्याकडे जे काही रिपोर्ट आले आहेत ते धक्कादायक आहेत. तिथं तरुणांना व्यसनाधीन आणि ड्रग्जच्या आहारी नेण्याचं पाप भाजपा करत आहेत. जसं उडता पंजाब आपण पाहिलं तसं उडता गुजरात झालं आहे", असं नाना पटोले म्हणाले.
 
पराभवाचं आत्मपरिक्षण करू
"गुजरातच्या जनतेनं कौल दिला आहे. आम्ही आमच्या पराभवाचं आत्मपरिक्षण करू. गुजरातमध्ये भाजपाचं दबावतंत्र चाललं असलं तरी हिमाचलमध्ये दबावतंत्र चाललेलं नाही.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती