शोपियांच्या वाठो भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठो येथे काही संशयित असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा दल एका ठिकाणी पोहोचल्यावर तेथे उपस्थित दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यानंतर प्रत्युत्तर देताना चकमक सुरू झाली.