प्रेमश्री असे या पत्नीचे नाव असून तिने पती सत्यवीरला त्याच्या काळा रंगामुळे सतत बोलायची त्याचा तिरस्कार करायची. एके दिवशी तिला राग आला आणि तिने नवरा झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवले. त्याला तातडीने आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
या प्रकरणात मयत सत्यवीरच्या भावाने हरवीर ने आपल्या वहिनी प्रेमश्रीच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली असून त्याने पोलिसांना सांगितले की घटनेच्या दिवशी तो वडिलांसोबत शेतात गेला होता आणि त्याचा भाऊ सत्यवीर हा घरात झोपला होता. हरवीरने भावाला शेतात चहा घेऊन यायला सांगितले. बऱ्याच वेळ झाला तरी भाऊ चहा घेऊन आला नाही म्हणून हरवीर त्याला बघायला घरी आला आणि त्याला घडलेले सर्व समजले. त्याने वाहिनी प्रेमश्रीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी प्रेमश्रीला अटक केली असून घटनेशी संबंधित सर्व साक्षीदार आणि पुरावे नायायालयात सादर केले. न्यायालयाने प्रेमश्रीला दोषी ठरवले आणि तिला 25 हजार रुपयांचा दंड आणि जन्मठेप सुनावली.