दिल्लीत शनिवारपासून शाळा सुरू होणार आहेत. या संदर्भात दिल्ली सरकारने आज म्हणजेच शुक्रवारी औपचारिक आदेश जारी केला आहे. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या निर्देशानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. सहावी वरील वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील, असे सरकारने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. इयत्ता 6 वी पासून मुले ताबडतोब शाळेत अभ्यासासाठी येऊ शकतील. 27 डिसेंबरपासून इयत्ता 5वीपर्यंत मुलांनाही शाळेत जाण्याची परवानगी असेल.
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाची पातळी पाहता आयोगाने १६ नोव्हेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आलेल्या अनेक निवेदनांचा विचार करून आज या निर्णयाचा आढावा घेत आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या वतीने बंदी उठवली आहे. आता निर्णय दिल्ली एनसीआरच्या सरकारांना घ्यायचा आहे.