ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी लोकांनी जागा आरक्षित केल्याचे समजते. या माध्यमातून आतापर्यंत गढवाल मंडल विकास निगमला ९५ हजारांचे उत्त्पन्न मिळाले आहे. गढवाल मंडल विकास निगमतर्फे (जीएमव्हीएन) गेल्यावर्षीपासून केदारनाथ येथे या गुहेची सोय करून देण्यात आली होती. केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अशाप्रकारे गुहा तयार करण्याची कल्पना सुचविली होती. सुरूवातीला या गुहेत राहण्याचे एका दिवसाचे भाडे ३००० रूपये इतके होते. तसेच ही गुहा किमान तीन दिवसांसाठी भाड्याने घेण्याची अट होती. मात्र, पर्यटकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे भाडे ९९० रूपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. सध्या या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी प्रतिरात्र १५०० आणि प्रतिदिन ९९० रूपये मोजावे लागतात.