संघाकडून यंदा पहिल्यांदाच मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन

बुधवार, 30 मे 2018 (17:28 IST)

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत मुस्लिम राष्ट्रीय मंचने यंदा पहिल्यांदाच  मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. येत्या ४ जूनला सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये  इफ्तार पार्टी होणार आहे. ३० देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांशिवाय मुस्लिम समाजातील २०० प्रतिष्ठित लोकांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर समाजातील १०० पाहुणेही यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोरे यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली.

मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी २०१५ पासून संघाकडून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशातील पश्चिम आणि दक्षिण भागातील मुस्लिमांपर्यंत पोहोचणे हे मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित करण्यामागचे संघाचे उद्धिष्ठ असल्याचे सांगण्यात येते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे मोठ्याप्रमाणात वाणिज्य दुतावास आहेत. मुंबईत मोठ्याप्रमाणात मुस्लिम उद्योगपती राहतात. त्यांनी देशाच्या योगदानात मोठे योगदान दिले आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांशी चर्चा करू इच्छितो, असे पाचपोरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती