ATS वरिष्ठ अधिकारी राजेश साहनी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मंगळवार, 29 मे 2018 (17:29 IST)

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातील (ATS) मध्ये धक्कादायक प्रकार घडला असून, यामध्ये कार्यरत असलेले  वरिष्ठ अधिकारी राजेश साहनी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. साहनी हे  एटीएसमध्ये पथकात  अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी काम करत होते. साहनी  त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  साहनी यांनी स्वत:वर सर्व्हिस रिव्हॉवरमधून गोळी झाडली आहे . 

यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले होते,  डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मागील आठवड्यात उत्तराखंडमध्ये एक  पाकिस्तानी हस्तकाला अटक केली होती. या कामगिरीत त्यांची  मोलाची भूमिका आहे.  राजेश सहानी 1992 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.  त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून पोलीस दलात मोठी खळबळ माजली. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे. तर या आगोदर मुंबईचे वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. चांगले जबाबदार अधिकारी कामच्या ताणामुळे असे करतात का ? असाही प्रश्न विचारला जातोय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती