कोटा शहरातील नांता भागातील ट्रेंचिंग ग्राउंडजवळ खासगी शाळेची बस उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे अर्धा डझन मुलांना किरकोळ दुखापत झाली.
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही बस कुन्हडी विकास नगर येथील एका खासगी शाळेची आहे. शाळा सुटल्यावर ती मुलांना सोडायला जात होती. हा अपघात नानता चौकाचौकापूर्वी घडला असून यामध्ये बसचे नियंत्रण सुटून ती पलटी होऊन सुमारे 7 ते 8 फूट रस्त्याच्या खाली पडली, जी जेसीबीच्या सहाय्याने सरळ करण्यात आली.
अपघाताताची माहिती मिळतातच स्थानिकांनी मुलांना तातडीनं काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यास सुरु केले. आणि सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी काही मुलांना रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर काढण्यात आले, जे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातात एका मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.