मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 1 ठार तर 7 जखमी

शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (13:09 IST)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी रात्री एमएसआरटीसी बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहे .
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी रात्री महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर सात जण जखमी झाले आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, ही घटना पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास घडली. “अहमदनगरमधील पाथर्डी आगाराची बस मुंबईकडे जात असताना ट्रकला धडकली. दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती.
 
तसेच या घटनेत विश्वनाथ भगवान वाघमारे नावाच्या प्रवाशाचा मृत्यू झाला असून 7 प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती