चार धाम यात्रेकरीता देशभरातून श्रद्धाळू येतात. परंतु, अनेक भाविकांची योग्य मार्गदर्शनाअभावी गैरसोय होते, अनधिकृत ठिकाणांहून नोंदणी केल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उत्तराखंड शासनाच्या पर्यटनविभागाद्वारे ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबविण्यास येत आहे. भाविकांसाठी
registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर आणि
Tourist Care Uttarakhand (Android/IOS) ॲपवर ही नोंदणीप्रक्रिया मोफत सुरु केली असून
01351364 हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे.