प्रेम शोधण्यासाठी सीमा ओलांडणे हा ट्रेंड बनत आहे. पाकिस्तानच्या सीमा हैदरनंतर आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भारताची अंजू तिच्या प्रेमासाठी पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा येथे पोहोचली आहे. या दोघांमध्ये चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती.34 वर्षीय अंजूचे आधीच लग्न झाले आहे आणि ती राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहत होती.
पाक मीडिया रिपोर्ट्सनुसार अंजू तिचा बॉयफ्रेंड नसरुल्लाच्या घरी आहे. सुरुवातीला पाक पोलिसांनी अंजूला चौकशीसाठी ताब्यात घेतले, परंतु तिच्याकडे वैध कागदपत्रे असल्याने पोलिसांना तिला सोडावे लागले. त्याचबरोबर अंजूच्या कुटुंबीयांनी तिचे नसरुल्लासोबतचे प्रेमसंबंध नाकारले आहेत. अंजूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ती वैध कागदपत्रांसह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या परवानगीने पाकिस्तानला भेट देण्यासाठी गेली आहे, परंतु पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे की अंजूचे नसरुल्लाहवर खूप प्रेम आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अंजूच्या पतीचे म्हणणे आहे की, ती कोणाच्या तरी संपर्कात होती, त्याला याची माहिती नव्हती. तिला परदेशात काम करायचे होते, म्हणून तिने 2020 मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला. अंजूच्या पतीने सांगितले की, त्यांना दोन मुले आहेत. तिने दोन्ही मुलांना न सांगता सोडून पाकिस्तान गाठले.
अंजूच्या पतीने सांगितले की, ती तिच्या माहेरच्या घरी गेली नाही. ती जयपूरला जात असल्याचे सांगून गेली होती, पण लाहोरला पोहोचल्यानंतर तिने व्हिडिओ कॉल करून पाकिस्तानला पोहोचल्याचे सांगितले. अंजूच्या पतीने तिला परत येण्याचे आवाहन केले आहे.