गुजरात : पावसाच्या पाण्यात 50 हुन अधिक सिलिंडर वाहून गेले,व्हिडीओ व्हायरल

सोमवार, 24 जुलै 2023 (09:58 IST)
सध्या पावसाने सर्वत्र झोडपले आहे. गुजरात मध्ये पावसाचा उद्रेक झाला असून सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. या मुळे नागरिकांना तारेवरची कसरत होत आहे. गुजरातील नवसारी येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. विजलपूर परिसरात गॅस सिलिंडरच्या गोदामांची भिंत कोसळल्यामुळे 50 हुन अधिक सिलिंडर पाण्यात वाहून गेले. या घटनेचा व्हिडीओ त्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  

गेल्या 4 -ते 5 दिवसांपासून गुजरातला पावसाने झोडपले आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पाण्यामुळे गॅस गोदामाची भिंत कोसळून 50 हुन अधिक सिलिंडर पाण्यात वाहून गेले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ मध्ये एका घराच्या छतावर डझनभर रिकामे सिलिंडर ठेवलेले आहे. पावसाचे पाणी छतावर भरून सिलिंडर पाण्यात तरंगू लागले आणि बाहेर पडून रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहत आहे. डझनापेक्षा अधिक सिलिंडर पाण्यात वाहताना पाहून लोकांना आश्चर्याचा  धक्का बसला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती