Rajasthan : दोन सख्ख्या बहिणींसोबत तरुणाचे लग्न, वर म्हणाला - मी दोन्ही बायकांना आनंदात नांदवेन

सोमवार, 15 मे 2023 (15:40 IST)
Rajasthan News : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका तरुणाने दोन मुलींशी लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. हरिओम मीना नावाच्या सुशिक्षित तरुणाचा दोन बहिणींसोबत असा विवाह झाला. हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या लग्नाची निमंत्रण पत्रे छापून ती वितरितही करण्यात आली होती. 
या अनोख्या लग्नात हरिओमचे संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळी आणि समाजातील लोकही सहभागी झाले होते. 
 
ही घटना आहे उनियारा उपविभागातील मोरझालाच्या झोपड्या गावातील. येथे राहणाऱ्या हरिओमने सांगितले की, कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, निवई उपविभागातील सिद्द गावातील रहिवासी बाबूलाल मीना यांची मोठी मुलगी कांता हिच्याशी लग्नाच्या बोलणी सुरु झाल्या.नंतर त्यांची भेट झाली तेव्हा कांता ने धाकटी व मानसिकदृष्ट्या कमकुवत बहीण सुमन हिच्याबद्दल खूप जिव्हाळा असल्याचे आपल्या मनाची गोष्ट सांगितली.ती त्याच तरुणाशी लग्न करेल जो आम्हा दोघी बहिणींशी एकत्र विवाह करेल. 
 
हरिओमच्या म्हणण्यानुसार, एकदा तो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ही स्थिती ऐकून आश्चर्य वाटले. पण धाकट्या बहिणीला सुमनला आयुष्यभर सांभाळायचे आहे,  असे कांताने सांगितल्यावर दोन्ही बहिणीं मधील असलेल्या जिव्हाळा त्यांच्या  लक्षात आला. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला. 
 
हरिओमच्या कुटुंबीयांनी 5 मे रोजी मोठ्या थाटामाटात हा अनोखा विवाह सोहळा आयोजित केला होता. कार्ड छापून वितरित करण्यात आले. वधु म्हणून, दोन्ही बहिणींनी अग्नीच्या साक्षीने हरिओमसोबत लग्नाच्या मंडपात एकत्र सप्तपदी पूर्ण केली. 
 
हरिओमसह  सासरच्या घरी आल्यावर दोन्ही नवविवाहित जोडप्यांना सर्व परंपरांसह घरात प्रवेश देण्यात आला आणि इतर विधी पूर्ण करण्यात आले. 
हरिओमने सांगितले की, तो स्वत: स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तर त्यांची पत्नी कांता उर्दूमधून बीएडआहे. तर कांताची धाकटी बहीण म्हणजेच हरिओमची दुसरी पत्नी सुमन मानसिक दुर्बलतेमुळे केवळ 8वीपर्यंतच शिकू शकली. 
 
वधू कांताने सांगितले की, ती आपली धाकटी बहीण सुमन हिला सावलीप्रमाणे आपल्यासोबत ठेवत आहे. अशा स्थितीत तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी व्हावं,असं तिला वाटायचं नाही आणि उपहासालाही तिला बळी पडावं लागेल. त्यामुळे मी अशा तरुणाशी लग्न कारेन जो आम्हा दोघी बहिणींशी लग्न करेल. असा विचार तिने केला. हरिओम ने या लग्नासाठी होकार दिला. हरीओमचे म्हणणे आहे की,मी दोघींना आनंदात नांदवेन. हरिओम आणि त्याच्या कुटुंबाने उचललेल्या या पावलाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
 


Edited By -Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती