कचरा गाडीतून नेला शिक्षकाचा मृतदेह

रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (15:26 IST)
सोशल मीडियावर राजस्थानच्या भरतपूर येथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होता आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना बघून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी भरतपूर येथे सीईटी परीक्षेची ड्युटी देण्यासाठी आलेल्या एका स्कूटीस्वार शिक्षकाला ट्रकने धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली महिला शिक्षिका जखमी झाली.
 
याबाबत माहिती मिळल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शिक्षकाचा मृतदेह रुग्णवाहिकेऐवजी कचरा गाडीतून शवागारात नेला. तर जखमी शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अशाप्रकारे पोलीस मृतदेह नेत असल्याचा व्हिडीओ करण्यात आला आणि  तो आता व्हायरल होत आहे.
 
मृत शिक्षक युगल सिंह हनुमानगड जिल्ह्यातील धाबा गावचे रहिवासी होते. त्यांचा दोन वर्षांपूर्वी  विवाह झाला होता आणि त्यांना 6 महिन्यांची मुलगीही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती