राजस्थान हाय कोर्ट : गोहत्येसाठी आजीवन कारावासाची शिक्षा हवी

बुधवार, 31 मे 2017 (13:52 IST)
राजस्थान हाय कोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहे की गायीला राष्ट्रीय पशू घोषित केले पाहिजे. कोर्टाने असे आदेश देखील दिले आहे की कायद्यात बदल करून गोहत्याच्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात यावी. सध्या गाय व गोवंश आणि बीफवरून देशभरात अनुकूल प्रतिकूल वादविवाद होत आहेत. अशाच संदर्भात एका प्रकरणाची राजस्थान हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायाधीशांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे गोहत्या करणाऱ्यास आजीवन कारावास देण्याची तरतूद कायद्यात करावी अशी मागणीही न्यायालयाने केली आहे. न्यायालयाच्या या निर्देशांमुळे आता हे प्रकरण आणखी वादविवादात सापडण्याची चिन्हे आहेत. 

वेबदुनिया वर वाचा