राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लडाखचे लोक चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहेत. ते ओरडून-ओरडून सावध करत आहेत. त्यांच्या या इशाऱ्याकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते. भारतासाठी कृपा करून त्यांचे म्हणणे ऐकावे. राहुल गांधी यांनी शेयर केलेल्या व्हिडिओत चीनने आमची जमीन घेतल्याचे लडाखचे लोक सांगताना दिसत आहेत. चिनी सैनिक गलवान खोऱ्यात १५ किलोमीटर आत आल्याचे एक नागरिक या व्हिडिओत सांगत आहे.Ladakhis say:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2020
China took our land.
PM says:
Nobody took our land.
Obviously, someone is lying. pic.twitter.com/kWNQQhjlY7