राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष

सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:18 IST)
अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली. राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं.

राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती