नारायण स्वामी यांची हरवलेली म्हैस कोद्रहल्ली येथे राहणाऱ्या मोहनने पकडली. त्यानंतर मोहन याने आसपासच्या गावांत विचारणाही केली. पण ही म्हैस कुठल्या शेतकऱ्याची आहे हे कळलचं नाही. त्यानंतर मोहन यांनी म्हशीचा फोटो काढला आणि फेसबूकवर पोस्ट केला. तसेच फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं 'ही म्हैस कुणाची आहे? शेअर करा आणि या म्हशीला तिच्या मालकापर्यंत पोहचवा'. ही पोस्ट अनेकांनी फेसबुकवर शेअर केली. अशाच प्रकारे ही पोस्ट नारायण स्वामी यांच्यापर्यंतही पोहोचली. नारायण स्वामी यांनी ही पोस्ट पाहिली आणि मग त्यांनी मोहन यांच्याशी संपर्क करत आपली हरवलेली म्हैस परत आणली.