गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी बजावला मतदानाचा हक्क

शनिवार, 9 डिसेंबर 2017 (11:01 IST)
गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (शनिवार) होणार आहे. 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे.
 
पहिल्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रुपानी यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंदिरात पूजा अर्चा केली. यानंतर रुपानी यांनी जनतेला मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती