आधार – पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ

शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (17:25 IST)

आता केंद्रीय अर्थ खात्याने आधार – पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. आता ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार – पॅन कार्ड लिंक करता येणार आहे.

केंद्र सरकारने पॅन कार्ड – आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम तारीख होती. मात्र, अजूनही असंख्य पॅन कार्ड धारकांना ‘आधार’शी लिंक करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी मुदतवाढीचा निर्णय घेतला. आता ३१ मार्च २०१८ रोजी पर्यंत आधार – पॅन कार्ड लिंक करता येणार आहे.

दरम्यान, प्रत्येक बँक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची अंतिम मुदत काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, देशातील ५० टक्के खात्यांनाच आधार संलग्नता असल्याची माहिती पुढे आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती