'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा', राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आवाहन

गुरूवार, 1 मे 2025 (18:30 IST)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भर दिला. यासाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहनही केले.
ALSO READ: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी समावेशक, प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यावर दिला भर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की ते पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभे आहे.
ALSO READ: १७ वर्षांपासून भारतात राहत होता, पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिकाचे निधन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी करतो. ते म्हणाले की, मी पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर करून त्यांना हा सन्मान द्यावा.

Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: नागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असताना फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती