पंतप्रधान मोदींना माफीवीर व्हावं लागेल-राहुल गांधी

रविवार, 19 जून 2022 (10:17 IST)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या प्रकारे वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना 'अग्निपथ' योजना मागे घ्यावी लागेल", असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार आठ वर्षांपासून 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान करत आहे, अशी टीका राहुल गांधी केली आहे.
 
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील अग्निपथ योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
 
प्रियांका गांधी म्हणाल्या, "सैन्यात भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या. तीन वर्षांपासून नोकरभरती झाली नाही. तरुणांच्या पायाला फोड आले होते. त्यांची निराशा झाली आहे. वायुसेनेतील भरती आणि भरतीच्या निकालाची तरुणांना प्रतीक्षा होती. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, नोकरभरती बंद केली."
 
प्रियांका गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सशस्त्र दलातील भरतीतील विलंबाबाबत लिहिलेल्या पत्राची प्रतही शेअर केली आहे.
 
या पत्राद्वारे त्यांनी सिंह यांना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांच्या मेहनतीचा आदर केला जावा यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची विनंती केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती