आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी घरी पोहोचले

शनिवार, 18 जून 2022 (10:43 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचा आज 100 वा वाढदिवस आहे.यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचून आईचे आशीर्वाद घेतले.त्यांनी आईचे पाय धुतले आणि एकत्र पूजा केली. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान आज पावागड येथील काली मंदिरात पूजा करणार आहेत.यानंतर ते वडोदरा येथे एका सभेला संबोधित करतील.पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत.ते राज्याला 21 हजार कोटींची भेट देणार आहेत.
 
पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन यांचा जन्म 18८ जून 1923 रोजी झाला.पंतप्रधानांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी वडनगर येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यांच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.रायसन परिसरातील 80 मीटर लांबीच्या रस्त्याचे नामकरण पूज्य हिराबा मार्ग असे करण्यात येणार आहे.कुटुंबाने जगन्नाथ मंदिरात अन्नछत्र करण्याचाही कार्यक्रम ठेवला आहे.
 
पंतप्रधान मोदी आज पावागड येथील काली मंदिरात पूजा करणार आहेत.ते मंदिरात ध्वजारोहणही करतील.मिळालेल्या माहितीनुसार, 500 वर्षांनंतर मंदिरात ध्वजारोहण होणार आहे.त्यांची श्रद्धा या मंदिराशीच जोडलेली आहे.डोंगरावर हे मंदिर असल्याने या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना रोपवेचा अवलंब करावा लागतो.यानंतर 250 पायऱ्या चढून गेल्यावर देवीआईचे दर्शन होते.
 
पंतप्रधान आज सकाळी पावागड येथील काली मंदिरात प्रार्थना करणार आहेत.त्यानंतर ते हेरिटेज फॉरेस्टकडे प्रयाण करतील.दुपारी वडोदरा येथे पंतप्रधान गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील.यादरम्यान ते 16 हजार कोटींहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.ते आज गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणी करतील आणि मुख्यमंत्री मातृशक्ती योजनेचा शुभारंभ करतील. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती