संसद मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण, सादर केले मोदी सरकार 3.0 चे विजन

गुरूवार, 27 जून 2024 (12:45 IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदच्या संयुक्त सत्र ला संबोधित करीत मोदी सरकार 3.0 चे विजन सादर केले. त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये पेपर लीक, आपत्काल, संविधान यांचा देखील उल्ल्लेख केला. 
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्या की , 1 जुलै पासून देशामध्ये भारतीय न्याय संहिता लागू होईल. तसेच CAA अंतर्गत शरणार्थींना नागरिकता दिली जाते आहे. या वाटणीमुळे पीडित अनेक कुटुंबांसाठी सन्माननीय जीवन जगणे सोप्पे होईल हे ठरले आहे. 
 
येणारी वेळ ही हरित युगाची आहे. सरकार याकरिता महत्वाची पाऊले टाकत आहे. आम्ही हरित व्यवसायांनावर गुंतवणूक वाढवत आहोत. ज्यामुळे ग्रीन जॉब वाढले आहे. विकासासोबत विरासत वर देखील काम, नालंदा विश्वविद्यालयसाठी झालेल्या कॅंपसमुळे गौरव वाढला. तसेच EVM  ने प्रत्येक आव्हानांना पार केले. तसेच राष्ट्रपतींनी अभिभाषणमध्ये संविधान आणि आपत्काल यांचा देखील उल्लेख केला. 
 
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, गरिबांचे सशक्तीकरण हेच विकासाचे आधार आहे. आमचा फोकस ग्रामिक विकासावर आहे. तसेच आम्ही शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवू. तसेच शेतकऱ्यांना 20 हजार करोड रुपये देण्यात येईल. गुंतवणूक आणि रोजगार वाढत आहे.  अश्या प्रकारे अनेक मुद्दे असलेले मोदी सरकारचे 3.0 विजन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सादर केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती